चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा कारागृहात कैद्याने गळफास घेत आत्महत्या केल्याने एकचं खळबळ उडाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील हत्या प्रकरणातील आरोपी उमेश नैताम हा मागील 11 महिन्यापासून जिल्हा कारागृहात बंदिस्त होता.
मागच्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील कैदी हा आजाराने मरण पावला होता काही दिवस ह्या घटनेला उलटत नाही तर 21 जुलैला खुनाच्या आरोपीने गळफास घेत आत्महत्या केली.
घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, उमेशने आत्महत्या का केली याच कारण अस्पष्ट आहे.