प्रतिनिधी/गुरू गुरनुले
News34मूल : मूल नागपूर मार्गावरील एचडीएफसी बॅंकेसमोर उभा ठेवलेला ट्रक चोरीस गेल्याची घटना काल मूल येथे घडली. येथील निलेश वर्धेवार यांच्या मालकीचा दहा चाकांचा ट्रक क्रमांक एमएच-34-एव्ही-9559 मागील पंधरा ते वीस दिवसांपासून काम नसल्याने येथील नागपूर मार्गावर उभा ठेवला होता. दररोज सकाळी व संध्याकाळी ट्रक मालक निलेश वर्धेवार उभ्या ठेवलेला ट्रक कडे जात असायचे. घटनेच्या दिवशी पहाटेपासून पुर्ण दिवस पाऊस सुरू असल्याने निलेश वर्धेवार ट्रक कडे जावु शकले नाही. दुसरे दिवशी पावसाने उसंत दिल्याने नेहमी प्रमाणे सकाळीच निलेश वर्धेवार उभ्या ट्रक कडे गेले असता जागेवर ट्रक दिसला नाही. त्यांनी आजुबाजुला शोध घेतला परंतू परिसरात कोठेही आढळला नाही. शेवटी निलेश वर्धेवार यांनी पोलीसात तक्रार नोंदविली आहे. अज्ञात चोरटयांनी चोरून नेलेल्या ट्रकच्या दर्शनी काचावर वर्धेवार ब्रदर्स आणि गणेश गुडस गॅरेज असे लिहिले आहे. ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम राठोड चोरीस गेलेल्या ट्रकचा शोध घेत आहेत.