मुल- महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभाग अंतर्गत येत असलेल्या गोसेखुर्द आसोलमेंढा तलावाच्या मुख्य कालव्याला लागून असलेल्या राजगड, फिस्कुटी,गडीसुरला,चांदापूर गावातील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती असून मुख्य कालव्याला लागूनच या गावाकडे पाणी जाणारे सब मायनर कालवे फुटले असल्यामुळें संबंधित गावातील शेतकऱ्यांच्या शेतात टेल पर्यंत कालव्याचे पाणी पोहचू शकत नाही. त्यामुळे टेलवरील शेतकरी कालव्यांच्या पाण्यापासून वंचित राहत असून अनेक शेतकऱ्यांच्या धानाची पीक मार खात आहेत करिता फुटलेले मायनर आणि मधले तुरुंब त्वरित दुरुस्त करावे अशी मागणी फिस्कृटी येथील ग्राम पंचायतीचे सरपंच नितीन गुरनुले यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
निसर्गाच्या पाण्याने रोवणे झाल्यानंतर धान पिकाला वाचविण्यासाठी गोसेखुर्द आसोलमेंढा तलावाच्या पाण्याची शेतकऱ्यांना नितांत गरज असते परंतु शेतीत पाणी जाणारे मायनर कालवे फुटून असल्याने शेतीला समांतर पाणी पुरवठा होऊ शकत नाही त्यामुळे धान पिकाला वाचविण्यासाठी दरवर्षीच झगडे होत आहेत, नुसते झगडे नाहीतर मारामारी सुदधा झालेली आहे ही परिस्थिती लक्षात घेता फुटलेल्या सब मायणरची नुसती डागदुगी न करता मजबूत बांधकाम करून त्वरित दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी शेतकरी राजगड, फिस्कृटी, विरई, गडीसुरला, चांदापूर व परिसरातल्या गावातील शेतकरी बांधवांच्या वतीने सरपंच नितीन गुरनुले यांनी केली आहे.

