बल्लारपूर - दिनांक 28.07.2021 ला माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार आमदार, बल्लारपूर विधानसभा तथा माजी अर्थ मंत्री व वन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू केलेल्या सेवा सप्ताहाच्या निमित्त आज बल्लारपूर शहरातील ज्या कोरोना काळात डॉक्टरांनी मागील 16 महिने स्वतःचा व आपल्या परिवाराचा जीव धोक्यात घालून बल्लारपूर मधील रुग्णांची दिवसरात्र सेवा केली तथा रुग्णांकडून बल्लारपूर शहरांत इतर डॉक्टरांच्या तुलनेत कमीत कमी फी घेऊन तसेच नेहमी गोरगरिबांची मदत करणारे अशा डॉक्टरांच्या ऋणातून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे डॉक्टर नंदा वैद्य तथा डॉक्टर वसंत साळवे यांचा राष्ट्रीय ध्वज देऊन सत्कार करण्यात आले.
या कार्यात सुधीर भाऊ फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, भाजपा शहर सचिव नीरज झाडें, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष सलीम नबी अहमद जी, सुधाकर सिक्का, कमल वर्मा,अनिकेत पोतर्लावार, प्रेरित इदनुरी, सावन शिवणकर, विक्की ईदनुरी आदी उपस्थित होते.