प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल (प्रतिनिधी)
मागील गेल्या पंधरा दिवसापासुन पावसाने डोळे वटारले असुन धान रोवणीला आले असतांना मुल-सावली या संयुक्त तालुक्यातील शेतीत थेंबभर पाणी नाही त्यामुळे येत्या दोन-,तीन दिवसात वरुन राज्याने पाणी पडले नाही तर धान परे करपतील आणि मेल्याशिवाय राहणार नाही करीता शेतीमध्ये पाणी आवश्यक आहे. सध्या स्थितीत मुळीच पाणी नाही. त्यामूळे शेतकरी संकटात सापडला असून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक असलेला पाणी मुल-सावली साठी आसोलामेंढा जलाशयामधुन सोडावे. अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांकरिता केली आहे.
मुल सावली तालुक्यातील भवराळा, राजगड, चांदापुर, खेडी, जुनासुर्ला, नवेगाव(भुजला)बेंबाळं, नांदगाव,बोनडला, गडीसुर्ला, फिस्कुटी, विरई यासह अनेक गांवातील शेकडो हेक्टर शेती केवळ आसोलामेंढा जलाशयाच्या पाण्यावर अवलंबुन आहे. शेतीच्या चालु हंगामात पेरणी प्रारंभी समाधानकारक पाऊस झाला. त्यामूळे परीसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी धान रोवणी करणे सोईचे व्हावे म्हणुन धान प-हे पेरणी केली. पेरणी केलेले धान रोवणीच्या दृष्टीने तयार होत असताना मागील पंधरा दिवसांपासुन पावसाने चांगलीच दडी मारली आहे. धान रोवणीच्या दृष्टीने पाहीजे त्या प्रमाणात पाऊस येत नसल्याने पेरणी केलेले धानाचे प-हे सुकायला लागली आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील गावात पाण्याचा दुष्काळ दिसून येत आहे. आणि सध्यास्थितीत उत्तम असलेले धानाचे प-हे काढुन त्यांची रोवणी न झाल्यास प-हे सुकण्याची दाट शक्यता असुन त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळुन शेतीचा हंगाम लांबणीवर जाऊ शकतो, असे झाल्यास दुबार पेरणी करीता शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध नाही. दुबार पेरणी करीता पुन्हा बाजारामधुन बियाणे खरेदी करणे भाग पडेल आणि सध्याच्या कोरोना महामारीच्या आर्थिक संकट काळात बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांना न परवडणारे आहे. आवश्यक प्रमाणात पाऊस येत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे धान प-हे वाचविण्यासाठी आसोलामेंढा तलावाचे पाणी नहराव्दारे सोडल्यास पिक वाचविणे सहज शक्य होईल. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट न येता आर्थिक भुर्दंडापासुनही शेतकरी दुर राहील. ही वास्तविकता लक्षात घेवुन संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी तातडीने आसोलामेंढा जलाशयाचे(तलावाचे) पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि जि.प.माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे मार्गदर्शनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर यांनी केले. आसोलामेंढा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना भेटुन मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर यांचेसह बाजार समितीचे उपसभापती संदीप कारमवार, शातारामजी कामडे संचालक , माजी उपसरपंच गौरव पुपरेड्डीवार, प्रदीप कामडे अनिल निकेसर, गणेश खोब्रागडे, तयुब खाॅ पठान, तुळशिराम मोहुर्ल, रूमदेव गोहणे, लोकनाथ नरमलवार, यांचेसह अनेक गावांतील आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.