घुग्गुस - शहरातील तुकडोजी नगर वार्ड क्रमांक 6 मध्ये राहणारे 27 वर्षीय युवक संतोष तुळशीदास चुने यांनी आपल्या दुकानातचं पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.
नेहमी प्रमाणे संतोष हा सकाळी 6.30 वाजता घराबाहेर पडला व चौकात नाश्ता करीत त्याने घुग्गुस-चंद्रपूर मार्गावरील असलेले लेडीज जनरल स्टोर्स दुकान उघडले मात्र दुकानाचे शटर अर्धवट बंद करीत आतमध्ये पंख्याला गळफास लावत आत्महत्या केली.
आत्महत्येचं नेमकं कारण काय हे अजूनही स्पष्ट झालेले नाही, मृतक संतोष यांच्या शेजारी पोलिसांना सुसाईड नोट मिळाले असून त्यामध्ये आत्महत्येसंबंधी कारणाचा काही उल्लेख आहे का याचा तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.