चंद्रपूर - मोठ्या शहरात जेव्हा गुंड हैदोस माजवितात तर त्यांचा माज खाकी वर्दी पार उतरवून टाकते मात्र चंद्रपूर सारख्या लहान शहरात जेव्हा गाव गुंड भर चौकात फिल्मी स्टाईल मारामारी करतात त्यावेळी मात्र पोलीस वेळेवर पोहचत नाही.
चंद्रपूर शहरात गजबजलेल्या ठिकाणी भर दुपारी गोळीबार होतो त्यानंतर 1 दिवस उलटताच पुन्हा वरोरा नाका चौकात पान ठेला धारक युवकाला युवकांचं घोळका भर दुपारी मारहाण करतं त्यावेळी सुद्धा पोलीस असंवेदनशील पणा दाखवितो.
14 जुलै ला 3 वाजताच्या सुमारास वरोरा नाका चौकात गाव गुंड एका युवकाला बेदम मारहाण करीत होते, नागरिक जमले, पोलिसांना फोन करण्यात आला मात्र पोलिसांनी काही गंभीरता दाखविली नाही.
त्यावेळी एका पत्रकाराने सदर दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला असता त्या गाव गुंडांनी पत्रकारांच्या दिशेने धाव घेतली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न झाला, त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, जर आमचा व्हिडीओ उद्या व्हायरल झाला तर याद राख तुला सोडणार नाही अशी धमकी दिली.
सदर प्रकरण घडल्यावर आरोपी युवक वरोरा नाका चौकात अनेक वेळ उभे राहिले रामनगर पोलिसांना वारंवार फोन करण्यात आला मात्र पोलीस काही आले नाही.
त्यानंतर सायंकाळी पोलीस फिर्यादीला सोबत घेत घटनास्थळी म्हणजे वरोरा नाका चौकात दाखल झाले व नंतर आरोपीच्या शोधात निघाले आरोपी न गवसल्याने पोलीस परत पोलीस स्टेशनला गेले.
मात्र 10 मिनिटानंतर आरोपी वरोरा नाका चौकात दाखल झाले व बराच वेळ तिथे उभे होते यावेळी सुद्धा पोलिसांना माहिती दिली मात्र पोलीस यावेळी आलेच नाही.
म्हणजे गाव गुंडांचा उद्रेक झाल्याशिवाय पोलीस घटनेची गंभीरता लक्षात घेणार नाही का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
आज युवक बंदूक हातात घेत भरदिवसा गोळीबाराच्या घटना घडवीत आहे, ह्या बंदुका यांच्याजवळ येतात याची साधी माहिती पोलिसांना नसते हा आश्चर्याचा विषय आहे.
गोळीबाराची घटना घडल्यावर सुद्धा पोलीस बेसावधपणे का वागत आहे?
गोळीबाराची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली मात्र वरोरा नाका चौकात गुंडांच्या घोळक्याने कुणीही मोबाईल मध्ये चित्रीकरण करू नये यासाठी काही युवक नागरिकांमध्ये उभे होते, म्हणजे सदर घटनेची संपूर्ण तयारी ते युवक करून आले होते.
गाव गुंडाकडून आता पत्रकारही सुरक्षित नाही, मग सामान्य नागरिक कसे सुरक्षित राहतील?
आरोपी दुसऱ्यांदा घटनास्थळी दाखल होतात म्हणजे ते पोलिसांना आवाहन देत आहे, मात्र खाकीची वचक कमी झाल्याने गाव गुंडांची हिंमत वाढत आहे.
