प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष कांग्रेसचे नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली तेंव्हापासूनच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील कँसरसारख्या दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांचे जीव वाचावे या हेतूने बँकेच्या शेतकरी कल्याण निधी मधून उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचे कर्तव्य पार पाडत आहे.एवढेच नव्हे तर साप चावून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना, घर जळून बेघर झालेल्यांना व धानाचे पुंजने जळून आकस्मिक आर्थिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन रुग्णांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम बँक करीत असून मुल येथील महिला रुग्ण कु.मीना सुधीर राचलवार यांचे घरी जाऊन त्यांना उपचारासाठी ४००००/-हजार. (चाळीस) रुपये मदतीचा चेक बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी महिला रुग्णाला दिला . बँकेचे अध्यक्ष संतोषशिंह रावत यांच्या समवेत यावेळी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनशाम येनुरकर, नगर सेवक विनोद कामडे, सुरेश फुलझेले, नितेश दुखदेवे, रुमदेव गोहणे, चावरे सर, बँकेचे अधिकारी नंदूजी मडावी, व कॅन्सरग्रस्त रुग्णाचा परिवार उपस्थित होते.
