मूल (गुरू गुरनुले)
कोकणात आलेल्या महापुरामूळे रत्नागिरी आणि चिपळुन परिसरातील नागरीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीत कोकणातील नागरीकांना मदतीचा हात देणे गरजेचे असल्याने अनेक भागांमधून विविध संस्थांच्या वतीने कोकणातील गरजुंना जी शक्य आहे ती मदत पोहोचविली जात आहे. याचाच एक भाग म्हणून प्रदेश काॅंग्रेस कमेटीच्या आवाहनाला साद देत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात मूल तालुका काॅंग्रेस कमेटीने संकटग्रस्त नागरीकांना मदत म्हणून तांदुळ, आणि डाळीचे दोनशे पाॅकेट जिल्हा काॅंग्रेस कमेटीच्या चंद्रपूर कार्यालयात रवाना करण्यात आले. मदत म्हणून दिलेले धान्य आज सकाळी एका आँटोद्वारे चंद्रपूरला रवाना करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, बाजार समिती उपसभापती संदीप कारमवार, पं.स. माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, नगरसेवक विनोद कामडे, ललीता फुलझेेले, रूपाली संतोषवार, संजय गेडाम, सुरेश भोपये, प्रकाश कंडालवार, मनोज कोंडबत्तुनवार आणि दिनेश कोलपॅकवार उपस्थित होते.

