चंद्रपूर - औचित्य होते लोकनेते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे पण हा क्षण अनोख्या उपक्रमाने साजरा व्हावा ही भाजपा पदाधिकाऱ्यांची इच्छा होती तसेच त्याचा संदेश सुद्धा जनसामान्यानं मध्ये जनजागृतीपर जायला हवा म्हणून तिरुमला सभागृह भिवापूर येथे आयोजित नेत्र तपासणी शिबिरात भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांनी लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त 30 जुलै रोजी नेत्रदानाचा संकल्प केला यामध्ये भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे, महापौर राखीताई कंचर्लावार, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,भारतीय जनता युवा मोर्चा महामंत्री प्रज्वलंत कडू ,मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, सचिन कोतपल्लीवार,रवी लोणकर, नगरसेविका छबुताई वैरागडे,भाजयुमो मध्य मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार,भाजप सचिव रामकुमार आक्केपेल्लीवार,महेश मेश्राम यांचा समावेश आहे सदर आयोजित कार्यक्रमात महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की जनसामान्यांनी सुद्धा या नेत्रदानाच्या चळवळीत सहभागी होऊन प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करायला हवा असे त्यांनी या वेळी सांगितले.
त्यानंतर महापौर राखीताई कंचर्लावार यांनी नेत्रदान हे श्रेष्ट दान असून जास्तीत जास्त नागरिकांनी या संकल्पात सहभागी होऊन जनजागृती करायला हवी असे त्यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमात भारतीय जनता युवा मोर्चा महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर, महामंत्री प्रज्वलंत कडू, श्रीकांत येलपुलवार, विवेक शेंडे,रिंकेश ठाकरे,आकाश घोटेकर,नितेश वाढई,अनिकेत चौधरी,वैभव बल्लेवार,प्रणय घोटेकर,भूषण धकाते,आकाश निकोडे,गौरव निकोडे, आदर्श चौधरी,अंकुश निकोडे रुपेश खंडाळकर, कुणाल निकोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमात 380 नागरिकांची नेत्र तपासणी करून चष्मे वितरण करण्यात आले नेत्र तपासणी करणाऱ्या चमू मध्ये
डॉ-एस. एम. पेंदाम, डॉ-डी. डी. येरमे, डॉ-माधुरी कुलसेंगे,कंडॉ. योगेंद्र इंदोरकर यांचा समावेश होता.
डॉ-एस. एम. पेंदाम, डॉ-डी. डी. येरमे, डॉ-माधुरी कुलसेंगे,कंडॉ. योगेंद्र इंदोरकर यांचा समावेश होता.

