चंद्रपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे प्रोफेसर, आयएमए अध्यक्ष व भाजपचे शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी कोरोना काळात कोविड रुग्णांची पिळवणूक करून त्यांचेकडून अवाजवी रक्कम वसुली करण्यात आली, 40 बेडची परवानगी घेऊन त्यांनी 80 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारले ही सर्व बाब मनपाच्या लेखा परीक्षणात उघडकीस आली असून त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व प्रशासनाने त्यांचेवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी नगरसेवक नंदू नागरकर यांनी केली आहे.
कोरोना काळात अनेकांनी या आजाराला बाजार बनविण्याचे काम केले, मात्र मोठ्या माशांना सोडून
लहान डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती.
रुग्णांकडून अवाजवी बिल आकारून त्यांच्या आजारपणाचा फायदा काहींनी घेतला.
डॉ. गुलवाडे यांच नाव समाजकारण व राजकारणात चांगले असून ते सर्वाना नेहमी सूचक संदेश देतात मात्र स्वतः त्याचे अनुकरण करीत नाही.
वर्धा जिल्ह्यात एकाही खाजगी डॉक्टरांनी आपलं कोविड रुग्णालय सुरू केलं नव्हतं सर्वांनी शासकीय रुग्णालयात आपली सेवा दिली मात्र त्याची प्रेरणा न घेता चंद्रपुरात सर्वांनी आपआपले रुग्णालय थाटून चक्क कोरोनाचा बाजार भरविला होता.
आता मनपाच्या लेखा परीक्षण अहवालात नागरिकांचे 94 लाख रुपये शिबिर आयोजित करून परत देण्याचे आदेश मनपाने दिले असून आता मनपाच्या आदेशाचे पालन होणार की नाही यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र चंद्रपूर मनपातील महापौर व आयुक्तांनी या बाबीची दखल घेत कारवाईसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी कांग्रेस नगरसेवक नंदू नागरकर यांनी केली आहे अन्यथा भाजप व प्रशासनाविरुद्ध कांग्रेस आंदोलन पुकारेल असा इशारा निवेदनातून मनपा आयुक्तांना दिला आहे.
यावेळी नगरसेवक नंदू नागरकर, सुनीता लोढीया, अश्विनी खोब्रागडे उपाध्यक्ष मा. प्रदेश काँग्रेस कमेटी अनुसूचित विभाग, अनु दहेगावकर जिल्हाध्यक्ष चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसूचित विभाग, शलिनी भगत शहर अध्यक्ष चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसूचित विभाग उपस्थित होते.