चंद्रपूर - 6 वर्षाच्याया प्रदीर्घ कालावधीनंतर चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटली, व जुलै महिन्यात जिल्ह्यातील दारूच्या दुकानाचा शुभारंभ झाला.
लोहारा येथील ग्रीन पार्क बार चा शुभारंभ होताच बार मालकाने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची आरती करीत पूजा केली.
सदरील आरती चा व्हिडीओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला, सध्या बेवड्यांचा देव म्हणजे विजय वडेट्टीवार अशी ओळख पालकमंत्री यांची झाली आहे.
नागपूर येथील कवी अनिल शेंडे यांनी बार मालकाच्या व्हिडीओ वर चक्क कविता चं लिहून टाकली आहे.
वऱ्हाडी ठेचा - अनिल शेंडे
आरती बेवड्यांच्या देवाची !
आरती विजुभाऊ । बेवड्यांचे तुम्ही ताऊ ।
ड्राय शहर ओले केले । किती धन्यवाद देऊ ।। आरती ..
देतो त्याला म्हणू देव । तुम्ही देवाधिदेव ।
तुमच्यामुळे बेवड्यांचे । फुटतील गावोगावी पेव ।। आरती ...
गुत्तेवाल्यांवरी तुम्ही । केले अनंत उपकार ।
उपकार फेडावया । तुमच्या मागेपुढे धाऊ ।। आरती...
खंडणी मागायाला । नका कोणाकडे जाऊ ।
घरपोच पेट्यांमध्ये । आम्ही धाडु तुमचा खाऊ ।। आरती ...
संस्थांनाही आता आमच्या। नाव तुमचेच देऊ।
फोटु लावुन बारामध्ये। तुमची आरतीच गाऊ ।। आरती..
कवी -- अनिल शेंडे।