(प्रशांत गेडाम)
शनिवार दिनांक 03/07/2021 रोजी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश घारे, पीएसआय गोपीचंद नेरकर व पोलीस पथक यांनी गस्ती दरम्यान नागपूर येथून तेलंगणा राज्यामध्ये कतली करिता जाणाऱ्या आयशर ट्रक वाहन क्र.TS-20, T-7383 व बोलेरो पिकप वाहन क्र.MH40,AK-7290 या दोन वाहनांना ताब्यात घेत त्या दोन वाहनांची झडती घेतले त्यामध्ये पाय बांधून कोंडून ठेवलेल्या एकूण 26 गोवंश यांची सुटका करून त्यांना सुखरूप गोशाळेमध्ये जमा केले आहे. सदर कारवाई मध्ये गोवंश व वाहने असे मिळून एकूण 23 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी तारे यांचे मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस ठाणेदार घारे तसेच पोलीस पथकातील विनोद बावणे ,सोनुले,ढोके, मंगेश श्रिरामे, अरविंद मेश्राम, रामटेके यांनी केली आहे. सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये अप क्र.२७६/२०२१नोंद करून प्राण्यांच्या पशु संरक्षण अधिनियम कलम १९७६ नुसार गुन्हे नोंद केले असुन आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. व पुढील तपास सिंदेवाही पोलिस करीत आहेत.

