चंद्रपूर - डॉ गुलवाडे कोविड सेंटरने हजारो कोविड रुग्णांवर उपचार केले.शासनाच्या नियमांना व अटींच्या अधीन राहून उपचाराचा खर्च आकारण्यात आला तर अनेकांना सूटही देण्यात आली.या सेंटरला 100 बेडची परवानगी होती.एक डॉक्टर म्हणून त्यावेळी रुग्णांचे प्राण वाचविणे याला महत्व दिले.सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांनी मदत मागितली ती आम्ही दिली,याचा लाभ येत्या निवडणुकीत भाजपा ला होऊ नये म्हणून राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप करीत आहेत.
दीड वर्षांपासून आपण सर्व जण कोविड19 चा सामना करीत आहोत. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातलेला आहे. ह्या कोविड 19आजाराचा प्रादुर्भाव चंद्रपुरात देखील जाणवू लागला. संपूर्ण चंद्रपूर जिल्हा , यवतमाळ , वर्धा , गडचिरोली , तेलंगणा राज्याचे आसिफाबाद , आदिलाबाद क्षेत्रातील कोविड ग्रस्तांचा ओढा औषोधोपचार व उपचारासाठी चंद्रपूर कडे वाढत होता.याचा बिमोड करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनासह चंद्रपूर महानगरपालिका देखील सज्ज होती. नियोजनाचा एक भाग म्हणून चंद्रपूर मनपा च्या जाहीर आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. गुलवाडे हॉस्पिटल चंद्रपूर कोविड केअर सेंटर ची स्थापना 100 रुग्णांसाठी करण्यात आली.
मा. जिल्हाधिकारी व मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कोविड चा नायनाट करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या विविध अक्चुअल बैठकीत , व्हर्चुअल आभासी बैठकीमध्ये वेळोवेळी अतिरिक्त खाटांची संख्या वाढविण्यासाठी चंद्रपुरातील सर्व DCH/ DCHC यांना मौखिक आदेश दिले होते. या मौखिक सूचनेनुसार डॉ गुलवाडे कोविड केअर सेंटर येथे तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर परवानगी देण्यात आली.खाटांची(बेड) माहिती जिल्हा प्रशासनाने सुचविलेल्या कोविड पोर्टल मध्ये उपलोड करण्यात आली होती. तसेच याची संपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाला व महानगर पालिकेला देण्यात आली होती. या कोविड च्या काळात विविध प्रकारचे कोविड ग्रस्त रुग्ण भरती करण्यास यंत्रणा कमी पडत होती.
इतर कुठेही भरती होण्यासाठी खाटा उपलब्ध नसल्यामुळे गंभीर रुग्णांना भरती करून घेण्यास त्यावेळी अनेक शासकीय अधिकारी,नेते मंडळी व राजकीय पक्ष सुचवीत होते.यात इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधींचाही समावेश होता.या मध्ये ९० ते ९२ % ऑक्सिजन मात्रेवर भरती होत असत. परंतु त्यानंतर त्यांची ऑक्सिजन मात्रा कोविडमुळे झपाट्याने खालावत होती. आणि असे सर्व रुग्ण ८० ते ८५ % ऑक्सिजन च्या मात्रेवर कोविड चा उपचार घेत होते. अश्या सर्व रुग्णांना HFNO ( High Flow Nasal Oxygen)मीटर च्या माध्यमातून ऑक्सिजन द्यावा लागत असे. तसेच बऱ्याच रुग्णांना आवश्यकतेनुसार Bipap मशीन च्या मदतीने देखील ऑक्सिजन द्यावा लागत असे. अश्या सर्व रुग्णाचा उपचार ICU सुविधा युक्त उपचार करण्यात आला.
यामधील काही अत्यवस्थ / अति गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर ची आवश्यकता होती. परंतु व्हेंटिलेटर खाटा बाहेर उपलब्ध नसल्यामुळे अश्या रुग्णांना Bipap मशीन च्या मदतीने देखील ऑक्सिजन द्यावा लागत होता. अश्या सर्व गंभीर रुग्णांना HFNO मीटर व Bipap मशीन च्या मदतीने ऑक्सिजन थेरेपी देऊन उपचार देण्यात आले.
हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन बेड्स उपलब्ध असताना हॉस्पिटलला आलेल्या रुग्णाला उपचार करण्यास नाकारता येणे शक्य नव्हते किंबहुना तसे करण्यास डॉक्टरी पेशेकडून अपेक्षित नसते.
या अश्या गंभीर परिस्थिती मध्ये डॉ. गुलवाडे कोविड सेंटरने रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद जोपासले व आपले कर्तव्य पार पाडले.
आता कोरोनाचे रुग्ण कमी झाले.स्थिती बदलली आहे.त्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप केले जात असेल तर हे निव्वळ प्रसिद्धीच्या हव्यासा पोटी काही राजकीय नेते
जनतेची निव्वळ दिशाभूल करीत आहेत.शिबिर घेऊन रुग्णांचे पैसे परत करण्याचे आदेश कुणीच दिलेले नसतांना त्यांनी प्रसिद्धी पत्रकात ते नमूद केले. यामुळे त्यांचा खोटारडेपणा उघडकीस आला असून नागरिकांना भडकविण्याचा हा प्रकार होय.