चंद्रपूर - चंद्रपुर जिल्हा कारागृह वर्ग - १ येथे महानगरपालीका चंद्रपुर यांच्या सहकार्याने चंद्रपुर जिल्हा कारागृह येथील ३७५ बंदी व तात्पुरते कारागृह येथील ६८ बंदी असे एकुण ४४३ कारागृहातील बंदयाना कोव्हीशिल्ड चे पहिला डोज लसीकरण करण्यात आले कारागृहातील सर्व ४४३ बंदी व ७५ कर्मचारी यांचे एकुण १०० % लसीकरण पुर्ण झालेले आहे सदर लसीकरण हे दोन टप्प्यात पुर्ण झालेले आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये ४५ वर्षावरील बंदयांचे तसेच कर्मचारी व दुस - या टप्प्यामध्ये १८ वर्षावरील बंदयांचे लसीकरणाच्या पुर्णत्वास कारागृह अधीक्षक वैभव आगे यांनी बंदयांच्या लसीकरणाकरिता विशेष प्रयत्न केले तसेच वैभव पु . आत्राम कारागृह वरिष्ठ तुरुंगाधिकारी यांनी लसीकरणाचा कार्यक्रम व्यवस्थीत रित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले, वैद्यकीय अधिकारी डॉ अमीत डांगेवार यांनी सर्व बंदयाच्या लसीकरणबाबत लस उपलब्ध करुन देणे बंदयांचे रजीस्ट्रेशन करणे इत्यादी प्रयत्न केले. बंदयांच्या लसीकरणाचा कार्यक्रम पार पाडण्याकरीता कारागृह अधिकारी रविंद्र जगताप अति . वरिष्ठ तुरुंगाधिकारी, नागनाथ खैरे , तुरुंगाधिकारी, सुहास नागमोते तुरुंगाधिकारी, शिवराम चवळे सुभेदार, सिताराम सुरकार, विजय भोरखडे शिपाई, रिंकु गौर शिपाई, निकेश बडवाईक, अजय चांदेकर, सचिन आटे यांनी अथक प्रयत्न केले.