चंद्रपूर - चंद्रपुर महानगर पालिका क्षेत्रातील झोन क्र.३ च्या हद्दीत येत असलेल्या कोल बंकर बायपास रोड ते स्मशानभुमी इंदिरा नगर ह्या रोडचे काम इमरजेंसी फंडातुन त्वरित करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. तसे निवेदन बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी युवा आघाडी चंद्रपुरच्या वतीने करण्यात महानगर पालिका आयुक्त यांना देण्यात आले आहे. यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी युवा आघाडी अध्यक्ष महेंद्र झाडे राजु रामटेके, अध्यक्ष चंद्रपुर विधानसभा, धम्मदिप बांबोळे,अमोल जुनघरे, ताजुन सुखदेवे,प्रफुल रामटेके, गिरीश बोंडे, जितेन्द्र लाडे आदींची उपस्थिती होती.
चंद्रपुर शहरातील इंदिरा नगर येथे असलेल्या स्मशानभुमी वर अंत्ययात्रेसाठी बंगाली कम्प, शाम नगर, प्रगति नगर, शंकर नगर, रय्यतवारी या भागातुन लोक येत असतात. मात्र स्मशानभुमी लगत असलेल्या राजीव गांधी नगर येथील नागरिकांना आवागमन करण्यासाठी रस्ताच शिल्लक नाही. कोल बंकर बायपास रोड ते स्मशानभुमी इंदिरा नगर कड़े जाणारा रस्ता हां अतिशय खराब व वाईट परिस्थितीत असल्यामुळे या रस्त्याने साधी दुचाकी किंवा पायी वाट काढणे कठीन झाले आहे.या वार्डात संगीता भोयर,अजय सरकार, जयश्री जुमडे, अमजद अली, हे चार नगरसेवक आहेत.मात्र त्यांचे सुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे कोल बंकर बायपास रोड ते स्मशानभुमी इंदिरा नगर चंद्रपुर या रस्त्याचे बांधकाम त्वरित पुर्ण करण्यात यावे व नागरिकाची अनेक वर्षापासुन असलेली समस्या सोडविण्यात यावि.अशी मागणी निवेदनच्या माध्यमातून करण्यात आली.