Tadoba national park
चंद्रपूर/ताडोबा - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प अनेक महिन्यापासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता.सध्या कोरोनाचा प्रकोप ओसरत असताना ताडोबा व्याघ्रप्रकल्प 3 महिन्यांसाठी सुरू करण्यात येत आहे, आता पर्यटकांना मान्सून सफारीचा आनंद घेता येणार आहे. 28 जूनपासून सदर पर्यटन हे 30 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.
ताडोब्यातील बफर झोन मधील 14 पैकी 13 गेट हे पर्यटकांसाठी सुरू राहणार आहे, त्यामध्ये आगरझरी, देवाडा-अडेगाव बफर, जुनोना, कोलारा, मदनापूर, अलिझेझा, नवेगाव-रामदेगी, निमढेला, पांगडी, मामला, झरी पेठ, केसलाघाट, सिरखेडा हे सर्व बफर गेट पुढील 3 महिन्यांसाठी पर्यटकांसाठी सुरू असणार.
सफारी बुकिंग प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने असणार व प्रथम येणाऱ्या पर्यटकाला सफारीसाठी प्राधान्य देण्यात येणार.
पर्यटकांनी सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझर व मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे, एका जिप्सीत 6 नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे.
सफारीची पहिली फेरी सकाळी 6.30 ते 10 वाजेपर्यंत असणार तर दुसरी फेरी 2.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे.
अशी माहिती उपसंचालक बफर ताडोबा क्षेत्र यांच्या कार्यालयाने दिली आहे.
