प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल :- अनेक जातींचा व पोटजातींचा समावेश असलेल्या बहुसंख्य ओबीसी बांधवावर लोकसंख्येच्या प्रमाणात नेहमीच अन्याय होत आलेला आहे आणि न्याय हक्कासाठी कित्येक वर्षांपासून लढा देऊन सुद्धा अन्याय होत आलेला आहे व आतातर स्थानिक स्वराज्य संथानमधील मिळत असलेले आरक्षण देखील रद्द करण्यात आल्याने बसुसंख्य असलेला बहुजन ओबीसी समाज राजकीय पदापासून नेहमीच वंचीत राहील यासाठी सर्वांनी एकत्र येऊन धरणे आंदोलन उभारण्यात येत आहे यासाठी लढा देणे गरजेचे आहे.
ओबीसी समाजाच्या विविध न्याय मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री नाम. छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात सर्वत्र धरणे आंदोलन केले जात असल्याने अखिल भारतीय समता परिषद जिल्हा चंद्रपूर च्या वतीने दिनांक 22 जून ला दुपारी बारा वाजता जिल्हा कचेरी समोर भव्य धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. यावेळी यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे तसेच ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी व ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे ,नॉन क्रिमीलेअर अट रद्द करण्यात यावी,ओबीसी विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी,शेतकऱ्यांना कृषी अवजारे व बियाणे मोफत देण्यात यावी. याकरिता केंद्र शासनाने पुढाकार घेऊन ओबीसींना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यातील अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, समता परिषदेचे जेष्ठ व युवक कार्यकर्ते महिला पदाधिकारी यांचेसह असंख्य ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जर ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मात्र ग्रामीण भागातूनही जण आंदोलन करण्यात येईल असेही ठरविण्यात आले आहे.
