प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - 23 जूनला गुन्हे अन्वेषण विभागातील कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना खबरीने अवैध दारु साठ्याबद्दल माहिती दिली.
माहितीच्या आधारे पोलीस कर्मचारी श्रीनिवास वाभीतकर, गणेश पराडकर यांनी BIT कॉलेज च्या मागील नाला बामणी येथे 13 खरड्याच्या खोक्यात 1 हजार 350 नग देशी दारूने भरलेल्या प्लास्टिक बॉटल किंमत 1 लाख 35 हजार पोलिसांनी जप्त केल्या.
सदर दारू जप्त करीत या प्रकरणातील अल्पवयीन आरोपिवर दारू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
