प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - गोपनीय माहितीच्या आधारे बल्लारपूर पोलिसांनी कन्नमवार वार्ड येथे मारलेल्या धाडीत 1 किलो 992 ग्राम गांजा किंमत 19 हजार 920 जप्त करण्यात आला, या प्रकरणी विकास उर्फ डुक्कर काट्या अजित पुरी ला अटक करण्यात आली.
मागील महिन्यात सुद्धा बल्लारपूर पोलिसांनी गांजा वाहतूक करणाऱ्यांना अटक केली होती, आधी रेल्वेने मोठ्या प्रमाणात गांजा येत होता तर आता छुप्या मार्गाने गांजाची तस्करी होत आहे.
बल्लारपूर पोलीस या अवैध धंद्याविरोधात कारवाई करीत असल्याने गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहे.
23 जून ला पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागातील सपोनि गायकवाड यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर कारवाई केली.
आरोपीवर अप क्रमांक 710/ 2021 कलम 8 (क),20(ब)ii (ब) NDPS Act अनवये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली.
