चंद्रपूर - कोरोनाच्या काळात टाळेबंदीमुळे अनेक पालक वर्गांना आर्थिक अडचनीचा सामना करावा लागत आहे, अश्यातच अभ्यासवर्ग ऑनलाइन घेण्यात आले तसेच सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या व सर्व परीक्षा ह्या ऑनलाइन पद्धतींने घेण्यात आल्या, ह्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणात परीक्षा शुल्क आकाराने हे पटण्याजोगे नसून सर्व विध्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करण्यात यावे व महाविद्यालय कडून ऑनलाइन वर्ग सुरू असतानाही शिक्षण शुल्क, वाचनालय, प्रयोगशाळा, इंटरनेट, व्यायामशाळा, वार्षिक कार्यक्रम च्या नावे विद्यालये बंद असताना देखील आताही अवाजवी फी आकारण्यात येत आहे, सर्व विद्यार्थी ऑनलाइन अभ्यासवर्गाचे लाभ घेत असताना इतर सुविधांच्या नावे पैसे कशाला असा सवाल देखील यावेळी करण्यात आला, सुप्रीम कोर्टाने संस्थांना फी आकारतना सवलत देण्याचे निर्देश देऊनही अनेक संस्था विद्यार्थ्यांना कोणताही दिलासा देत असल्याचे दिसत नाही, त्यासाठी विद्यालयाच्या फिज मध्ये सवलत देण्यासाठी विद्यापीठामार्फत सर्व संस्थांना आदेश देण्यात यावे तसेच ज्या विद्यार्थ्यांचे मागील शुल्क भरले नाही अशा विद्यार्थ्यांना परिक्षेपासून व शिक्षणापासून वंचित ठेऊ नये यासाठी मनवीसे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे यांच्या नेतृत्वात व मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या मार्गदर्शनात सदर मागणीचे निवेदन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव अनिल चिताडे याना बुधवारी सुपूर्द करण्यात आले. तसेच सदर निवेदनामार्फत उच्च शिक्षणमंत्री व शालेय मंत्री याना देखील निवेदन देऊन सवलत देण्यासंबंधी मागणी करण्यात आली. सदर निवेदनावर येणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत विषय ठेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासंबंधी चर्चा करून सकारत्मक निर्णय घेण्याचे आश्वासन कुलसचिव अनिल चिताडे यांनी दिले, यावेळी नागाळा गटग्रामपंचायत सदस्य नितीन टेकाम, मनसे शिक्षक सेनेचे कैलास खुजे आदी उपस्थित होते.
This is too unfair Clg does not open but clg take fees from student
उत्तर द्याहटवा