चंद्रपूर - महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात दिनांक १२ जून २०२१ रोजी वीजचोरीविरूध्द विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत चंद्रपूर व गडचिरेाली मंडलात या एकाच दिवशी एकंदरीत ९२ वीजचोरया पकडण्यात आल्या. या वीजचोरांनी एकंदरीत २८ लाख ११ हजार रूपयांची वीजचोरी केल्याचे उघडकिस आले आहे. यात २४ वीजचेार हे आकडेबहाददर तर ६८ वीजग्राहकांनी वीजेच्या मीटर्समध्ये छेडछाड करून वीजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या सर्व वीजचेारांनी एकंदरीत १ लाख ४६ हजार ४३८ युनिटस वीजचेारी केली.
ही मोहिम राबवितांना चंद्रपुर परिमंडळाचे मुख्य अभिेयंता श्री.सुनिल देशपांडे यांनी , वीज चोरीविरुद्ध कोविड-१९ सुचनांचे काटेकोरपणे पालन कटाक्षाने करण्यात येण्याच्या सुचना सर्व अधिक्षक , कार्यकारी , उपकार्यकारी व सहाय्यक अभियंता यांना केल्या होत्या. त्याप्रमाणे मोहिमेत समिल सर्व अभियंता व कर्मचारी यांना सॅनिटायझर्स व मास्क् वापरण्याचे बंधन घालुन देण्यात आले होते. या मोहिमेमुळे वीजचोरांचे धाबे दणावले. असुन महावितरणची करडी नजर वीजचोरांवर आहे. व अशाच मोहिमा पुढेही राबविण्यात येणार आहेत.
एकंदरीत ९२ वीज चोरांविरूध्द, वीजकायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वीजेच्या मीटर्समध्ये छेडछाड करण्यात आलेल्या वीजचोरीच्या प्रकांरामध्ये ,वीजचोरांनी नवनवीन क्लृप्त्या वापरुन वीजचोरी केल्याचे उघडकिस आले आहेत. उल्लेखनियरित्या आलापल्ली विभागात वीजेच्या गैरवापराच्या ८ घटना उघडकिस आल्या व त्यांनी १३३६ वीज युनिटस बेकायदा वापरले असून ७१ हजार रुपयांचा दंड त्यांना ठोठावण्यात आला असून कलम १२६ अंतर्गत कारवाई करण्यात आला आहे.
चंद्रपूर मंडलाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती. संध्या चिवंडे व गडचिरोली मंडलाचे अधिक्षक अभियंता श्री. गाडगे यांच्या मार्गदर्शनात ब्रम्हपुरी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. काळे, आलापल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मेश्राम, चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. फरासखनेवाला, बल्लारषा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. तेलंग व वरोरा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.राठी यांनी वीजचोरी पकडण्याची कारवाई त्यांच्या उपविभागिय व शाखा अभियंता तसेच जनमित्रांसोबत पार पाडली.
चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी वीजग्राहकांना वीज चोरीपासून प्रवृत्त होण्याचे व कायदेशीर मार्गाने वीज वापरण्याचे तसेच वीजबील वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.