प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपुर: खा. राहुलजी गांधी यांचा १९ जून रोजी वाढदिवस असून या वाढदिवसाचे औचित्य साधून बल्लारपुरात ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला आहे.युवक कांग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे व पूर्व खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनाथ व जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया यांच्या नेतृत्वात चेतन गेडाम ने प्रदर्शन केले. मागील दीड वर्षांपासून देश कोरोना महामारीचा सामना करत आहे. या कोरोनाने शेतकरी, कष्टकरी, कामकरी, हातावरचे पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार झाले. पंतप्रधानांनी कोरोना काळात जनतेच्या जिवीताशी खेळ केला असून ‘आपली प्रतिमा संवर्धन’ करण्यासाठी इव्हेंटबाजीवरच जास्त लक्ष दिले. कोरोनाने देशात विदारक चित्र असताना राहुल गांधीच्या वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरा करणे काँग्रेस विचाराला पटणारे नाही. हे लक्षात घेऊन राहुल गांधीचा वाढदिवस हा ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा केला आहे. बल्लारपुरात बस्ती विभाग महात्मा गांधी पुतळयाच्या परिसरात युवक काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले. बेरोजगारी विरोधात आंदोलन करून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केल्या . देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांच्याशिवाय पर्याय नसून २०२४ साली राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प या दिवशी केला आहे. केंद्राचा जाहीर विरोध केला वाढत्या बेरोजगारी व गैस सिलेंडर दरवाढी विरोध नारेबाजी केली. गरजुना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. यावेळी युवक कांग्रेस विधानसभा अध्यक्ष चेतन गेडाम सिकंदर खान, शंकर महाकाली, संदीप नाक्षिणे, शैलेश लांजेवार, चंचल मून, काशी मेगनवार,तपन उगले, अक्षय वाढरे,चिंटू मारपाक,रॉशन ढेगळे,सोहेल खान, मोहम्मद भाई, विकास श्रीवास,एजाज भाई, बाबु खान, दिनेश कैथेल,दानिश शेख़, अरबाज़ भाई, राजकरण केशकर, मोहमद अहमद, राजेश यादव बबलू केशकर आदींच्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.