चंद्रपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आर्थिक संकट आले असताना शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिणानिमित्त सामाजिक तसेच आर्थिक बांधिलकी जपून ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण या धोरणानंतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात बळीराजाला बळकट करण्याकरिता गट ग्राम पंचायत नागाळा येथे शेतकऱ्यांना मोफत रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच सौ. रंजना कांबळे उप सरपंच सज्जन सातपुते तथा संपूर्ण सदस्य या सोबतच आतिश चीमुरकर, विकास विरुटकर, राहुल विरुटकर, विक्रांत सहारे, विनय धोबे, गणेश सिंग ठाकूर, अशोक चीलखरे, सूरज घोंगे, बाळु भगत, सुमित अग्रवाल, वसीम खान, सिकंदर खान, सद्दाम शेख, सचिन मिश्रा, करण वैरागडे, वैभव काळे आदींची उपस्थिती होती.