सिंदेवाही - सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील पवनपार (टेकरी) गावाजवळील साई राईस मिल परिसरात 12 जूनला वाघीण आपल्या 2 बछड्या समवेत ठाण मांडून बसली होती.
वाघांना बघण्यासाठी नागरिकांनी त्या परिसरात गर्दी केल्याने वनविभागाच व पोलिसांच्या चमूने गर्दीला बाजूला केले.
अचानक 3 वाघ सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गावालगत दिसल्याने नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
वनविभाग व पोलिसांच्या चमूने वाघीण व 2 बछड्याना जंगलाच्या दिशेने हाकलून लावले.
