News34
चंद्रपूर - भारतीय जनता पार्टीचा आदर्श असणारे व जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिना निमित्य महानगरातील विविध भागात श्रद्धांजली सभेचे आयोजन बुधवारी(२३जून)ला सकाळी १० च्या सुमारास करण्यात आले.यावेळी महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार आणि ब्रिजभूषण पाझारे यांनी तुकुम मंडळातील १४ शक्तिकेंद्रावर हजेरी लावून डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन केले.
डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्र निर्मितीसाठी केलेले कार्य,त्याग व समर्पण जनतेला कळावे म्हणून तुकुम मंडळातील ५९ बूथचा समावेश असणाऱ्या गोंड मोहल्ला,तुकुम तलाव,नेहरू नगर,छत्रपती नगर,तुकुम,विवेकनगर येथील एकूण १४ शक्तिकेंद्रावर नागरिकांनी डॉ मुखर्जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.यावेळी उपस्थित नागरिकांना आर्टिकल ३७० हे पुस्तक व डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची महिती देणारे पत्रक वाटप करण्यात आले.
या परिसरातील भाजपा नगरसेवक माजी महापौर अंजली घोटेकर,उप महापौर अनिल फुलझेले,सुभाष कासंगोट्टूवार, माया उईके, शीला चव्हाण, सोपान वायकर, शीतल गुरनुले, वनिता डुकरे, संदीप आवारी, पुष्पा उराडे पुढाकार घेत डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे जीवन चरित्र विशद केले.
शक्तिकेंद्र प्रमुख प्राचार्य प्रज्ञा बोरगमवार, रवींद्र गुरनुले, विठ्ठल डुकरे,दिनकर कनकुलवार, अशोक तूरणकर माया मांदाडे ,मेघा उईके, गजानन भोयर ,संजय भट्टलवार ,माया बुरडकर ,वंदना सोनुले, पुरुषोत्तम सहारे, सुशील बुरांडे, संजय उराडे, गणेश ठाकरे यांनी यशस्वीतेसाठी महत्वाची भूमिका बजावली.या अभिवादन प्रकल्पाचे प्रमुख ब्रिजभूषण पाझारे यांनी सर्वांचे आभार मानले.
