चिमूर - चिमूर कांपा मार्गावरील बीएमसी चौकात 2 दुचाकी वाहनांची आपसात धडक झाल्याने दोघे जागीच ठार झाले तर 1 गंभीर जखमी झाला.
रविवार 27 जून सकाळी 11 वाजेदरम्यान ही घटना घडली.
चिमूर येथील इंदिरानगर परिसरात राहणारे 47 वर्षीय अजय राऊत आपल्या दुचाकी क्रमांक एमएच 34 एवाय 8708 ने कांपा वरून चिमूरला जात होते.
त्याचवेळी मालेवाडा पुलियावर काम करणारे कामगार शिवणी, मध्यप्रदेश निवासी 24 वर्षीय सनी आरोवा व सिंदेवाही तालुक्यातील नाचनभट्टी निवासी 25 वर्षीय अतुल चौधरी हे आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एमएच 34 6409 ने चिमूर वरून कांपाच्या दिशेने जात असताना, दोन्ही दुचाकी आमनेसामने धडकल्या ही धडक इतकी जोरदार होती की अजय राऊत व सनी आरोवा यांचा जागीच मृत्यू झाला, तर अतुल चौधरी हा गंभीररीत्या जखमी झाला असता त्याला तात्काळ चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदन साठी पाठविण्यात आले, घटनेचा पुढील तपास एपीआय मंगेश मोहोड व पोउपनी अलिम शेख करीत आहे.
