प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल- वृक्ष हे मानवाचे संगे सोयरे आहेत लहान मुलांचे पालन पोषण करुन मोठे करतो तेच मुले म्हातारपणामध्ये आई-वडिलांना साथ देतात तसेच वृक्षाचे आहे, लहान वृक्ष लावून त्याचे संगोपन केले तर तेच वृक्ष मानवाला व संपूर्ण सृष्टीतील प्राणीमात्रांना प्राणवायू( आक्सिजन) देऊन आयुष्य वाढविण्याचे काम करते म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे म्हटल्या जाते करिता मुल नगरातील प्रत्येक नागरिकांनी आप-आपल्या घरी वृक्षारोपण करावे व नगर हिरवेगार आणि सुंदर करावे असा सल्ला मुल नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रा.रत्नमाला भोयर यांनी वटपौर्णिमेनिमित विविध जातीचे वृक्ष लावून मुलच्या जनतेला एक संदेश दिला. नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्थेच्या संघटिका तथा मुल नगराच्या नगराध्यक्षा प्रा.रत्नमाला भोयर यांनी नगरात वृक्षारोपण केले याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या संजीवनी वाघरे, नगर सेविका प्रभा चौथाले, सौ.शुभांगी भोयर, स्नुषा भोयर यांचेसह वार्डातील अनेक महिला या उपक्रमात सहभाग घेतला होता.
