बल्लारपूर - 25 जून 1975 ला तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात इमर्जन्सी लावली होती, या इमर्जन्सी मुळे देशातील लोकशाहीचा गळा घोटण्यात आला, लाखो नागरिकांना तुरुंगात टाकण्यात आले होते, वर्तमान पत्रावर बंदी लावण्यात आली होती, नागरिकांचे अधिकार हिसकवण्याचे काम त्यावेळी गांधी सरकारने केले होते.
या कृत्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी दरवर्षी काळा दिवस पाळते.
बल्लारपूर शहरात भाजपचे जेष्ठ नेते चंदनसिंग चंदेल यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोंडावर व हातावर काळी पट्टी लावत निषेध केला.
यावेळी बल्लारपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, शिवचंद द्विवेदी, प्रदेश कामगार नेते अजय दुबे, निलेश खरबडे, सतविंदर सिंग दारी, आशिष देवतळे, रेणुका दुधे, वैशाली जोशी, सारिका कणकम, सुवर्णा भटारकर, वर्षा सूनचुवार, आरती आक्केवार, सलीम अहमद आदींची उपस्थिती होती.

