प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्याची व शहराची कार्यकारणी वंचितचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात गठित करण्यात आली.
सर्व समाजातील, सर्व जातीधर्मातील, समूहातील गटाला वंचित बहुजन आघाडी तालुका व शहर कार्यकारणी मध्ये समाविष्ट करून संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच जिल्हाभर होणाऱ्या काँग्रेस बीजेपीच्या जनविरोधी नीतीला छेद देण्यासाठी एक संघर्ष म्हणून व सर्वांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी गठित करण्यात आली. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाचे व धोरणाचे पालन करून सर्व पदाधिकारी काम करणार असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले.
वंचितचे विदर्भ समन्वयक राजु झोडे तसेच जिल्हा पदाधिकार्यांच्या उपस्थितीत बल्लारपूर तालुका अध्यक्ष म्हणून सचिन पावडे तर बल्लारपूर शहर अध्यक्ष संपतभाऊ कोरडे यांची निवड करण्यात आली. शहर उपाध्यक्ष जाकीर खान, नवीन कलवाला, प्रदीप झांमरे, दिनेश दुपारे तर सचिन कोचाळे, स्नेहल साखरे, भगतसिंग झगडा यांची महासचिव म्हणून निवड करण्यात आली. बल्लारपूर तालुका कार्यकारणी मध्ये उमेश वाढई, लखन उराडे, अतुल पावडे उपाध्यक्ष तर महादेव शंकर मोहम्मद शेख मंगेश सोनवणे सचिन कोरसे महासचिव म्हणून निवड करण्यात आली. तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची सचिव व सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
वंचित चे नेते राजू झोडे, जयदीप खोबरागडे तसेच जिल्हा पदाधिकार्यांच्या उपस्थितीत सर्व तालुका पदाधिकाऱ्यांची व शहर पदाधिकार्यांची निवड केली. सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.