प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - मागील दीड वर्षांपासून नागरिकांचे व्यवसाय पूर्णतः ठप्प पडून होते, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने 2 महिने राज्य सरकारने संचारबंदी लागू केली होती.
मात्र यावेळी महावितरण तर्फे वीज बिलाचा भरणा न केलेल्या नागरिकांचे वीज कनेक्शन कापण्याची जणू मोहीम सुरू केली.
इतकेच नव्हे तर वीज बिलावर व्याज लावून वाढीव वीजबिल नागरिकांना मिळाले, राज्य सरकारने वीज बिलावर 30 टक्के सूट देण्याची घोषणा केली मात्र ती हवेतच विरली.
सरकारने नागरिकांच्या परिस्थितीचा विचार करून नागरिकांना वीज बिलाचे चार ते 5 हफ्ते पाडून द्यावे जेणेकरून नागरिक पैश्याची जुळवाजुळव करीत वीज बिलाचा भरणा करेल.
अशी नागरिकांच्या हिताच्या मागणीचे निवेदन बल्लारपूर अमन पसंद कमेटी यांनी तहसीलदार यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले.
यावेळी कमेटीचे अध्यक्ष इस्माईल ढाकवाला, सचिव ताहीर हुसेन, कुतुबद्दीन सिटी, सैय्यद अजीज, शफीक, प्रसिध्दि प्रमुख आफताब पठाण उपस्थित होते.

