प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल- इंग्रजांच्या राजवटीत धर्मांतर,अन्यायी, जुलमी, सावकारी,धोरण,महिलांवर इंग्रजंकडून होणारे अत्याचार विरुद्ध उलगुलान करत देशाच्या स्वातंत्र्य संग्रामची दशा व दिशा, बदलून वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या तत्कालीन अखंड भारतातील तरुणांना देशप्रेमाची प्रेरीत करुन क्रांतीची ज्योत तेवत ठेवणाऱ्या धरती बा भगवान बिरसा मुंडा यांना अखिल भारतीय आदिवासी परिषद मुल च्या वतीने घरगुती स्वरूपात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी आदिवासी परिषदेचे अध्यक्ष तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे, बंडू गेडाम, हेमंत कनाके ,दीपक मडावी, चित्रकार भारत सलाम, बंडू परचके, मनीष कन्नके, अल्का मडावी, मजूषा येरमे, अनुसया मडावी, सावित्रीबाई पंधरे, योगिता मडावी, आदी आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.
