मूल- राष्ट्रीय माळी महासंघाची बैठक ३० मे २०२१ रोजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणलाईन पद्धतीने झुंमआपद्वारे घेण्यात आली. या सभेला राष्ट्रीय कार्यकारिणीचे राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. पार पडलेल्या सभेत प्रदेश कार्यकारणी व जिल्ह्यातील पदाधिकारी निवडण्याचे अधिकार प्रदेश अध्यक्ष यांना देण्यात आले असून महराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष माजी सहाय्यक उपवनसंरक्षक तथा रोटरी क्लबचे अध्यक्ष अरुण तिखे यांनी प्रदेश कार्यकारणीची व जिल्हा कार्यकरणीची निवड केली असून राज्यकार्यकरणीत राज्य उपाध्यक्ष पदी ब्रम्हपुरी येथील प्राचार्या डाँक्टर. एन.एस. कोकोडे यांची निवड करण्यात आली तर चंद्रपूर येथील प्रदिध सर्जन डाँक्टर. संजय घाटे यांची महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडी पदावर नियुक्ती निवड झाली. तसेच पूर्व विदर्भ विभाग विभागीय पदाधिकारी म्हणून सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी चंद्रकांत बोरकर यांची विभागीय अध्यक्ष, मुकुंदराव पोटदुखे यांची विभागीय कार्याध्यक्ष, विभागीय महासचिव म्हणून जेष्ठ पत्रकार गुरु गुरनुले, विभागीय उपाध्यक्ष प्रा.प्रदीप दहीकर,मनोहर बारस्कर, धर्मेंद्र नंदरधने, सुरेशराव खसारे, विभागीय कोषाध्यक्ष पदी प्रकाशराव वरूडकर, विभागीय सचिव प्रवीण बेलसरे, राजेश कावलकर यांची निवड करण्यात आली. विभागीय आघाडी पूर्व विदर्भ पदाधिकारी पदावर विभागीय महिला आघाडीच्या अध्यक्षा डाँक्टर विजय इंदूरकर, प्राध्यापक आघाडी विभागीय अध्यक्ष पदी गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रा.डाँक्टर.ईश्वर मोहूर्ले तर उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष म्हणून रोडमल गेहलोत, विभागीय महिला महासचिव पदी सौ.धनश्री पाटील यांची निवड करण्यात आली. चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी मध्ये चंद्रपूर जिल्हा ग्रामीण-१ अध्यक्ष ,पदावर समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक माजी जि. प.सदश प्रा.रामभाऊ महाडोळे ,जिल्हा ग्रामीण-२ मध्ये निलेश खरबडे, कार्यधक्ष पदी गुरुदास चौधरी, व नगर सेवक रवींद्र गुरनुले, चंद्रपूर महानगर अध्यक्ष विजय चहारे, कार्याध्यक्ष राहुल बनकर,युवक आघाडी अध्यक्ष विशाल निंबाळकर, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी होतकरू व कर्तव्य दक्ष,तथा पर्यावरण मानवता विकास संस्थेच्या जिल्हा सचिव रत्नाताई चौधरी,व सौ.सुनिता खंडाळकर यांची निवड करण्यात आली.तर गडचिरोली जिल्हा कार्यकरणीत जिल्हाध्यक्ष-१ प्रा.जयंत राऊत, अध्यक्ष-२ प्रा.प्रकाश सोनूले, महासचिव पुरुषोत्तम गुरनुले, महिला आघाडी अध्यक्ष प्रा,डाँक्टर. रजनी वाढई तर युवक आघाडी अध्यक्ष पदी विपीन राऊत यांनी निवड करण्यात आली. जिल्ह्यातील इतर पदाधिकारी निवडण्याचे अधिकार त्या-त्या जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहे. माळी महासंघाच्या निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे समाज बांधवांतर्फे जि. प.अध्यक्ष संध्याताई गुरनुले, माजी न.प.अध्यक्ष उषा शेंडे, माजी उ.पा. प्रवीण मोहूर्ले, प्रा.सुधीर नागोशे, विजय राऊत, नगर सेविका, वंदना तिखे,प्रा.विजय लोनबले, दीपक पाटील वाढई, डाँक्टर पद्माकर लेनगुरे, नामदेवराव गावतुरे, भी.तू. भेंडारे (गुरुजी) रत्नमाला ठाकरे, अरविंद जेंगठे,बालगोविंद आदे, नानाजी मंदाडे, राकेश मोहूर्ले, बंडू गुरनुले, अजय महाडोळे, रोहित निकुरे, ,विषवनाथ ठाकरे, राजेश मंदाडे, नगर सेविका शांता मंदाडे, वामन मंदाडे, जितेंद्र लेनगुरे, गुरुदास भेंडारे, आशाताई नागोशे, कविता मोहूर्ले, वंदना गुरनुले, माधुरी गुरनुले, नंदा शेंडे, तरुणा रसे, सीमाताई लोनबले, गोलू गुरनुले, भाऊजी लेनगुरे, संदीप वाढई, मनोज ठाकरे, प्रमोद महाडोळे, यांचेसह शहरी व ग्रामीण भागातील समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे.