चंद्रपूर - जंगल, दऱ्या खोरे, पहाड, गडचिरोली सारखा दुर्गम भाग, वादळ, वारा, पाउस, कडयाक्याची थंडी, या सर्व ऋतून महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असतात.
करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने महावितरण चंद्रपूर परिमंडळातील १६ कर्मचाऱ्यांनी मृत्यूमुखी पडले तर ३२७ बाधित झाले. यापैकी २८७ बरे झाले. एकीकडे करोनासोबत लढा तर दुसरी कडे ग्राहकांच्या तक्रारी मार्च, एप्रिल व मे च्या उन्हात सोडविण्यासाठी सोपविण्यात आलेले काम अशी दुहेरी कसरत जीव मुठीत घेऊन तब्बल १४हजार ६२९ तक्रारी त्यांनी मार्च, एप्रिल व मे महिन्याच्या तडपत्या उन्हात सोडविल्या.
चंद्रपूर मंडळात९ हजार ७२७ तर गडचिरोली मंडलात ४ हजार९०२ तक्रारी सोडविण्यात आल्या. या सर्व तक्रारी महावितरण च्या केंद्रीय ग्राहक सुविधा केंद्रावर नोंदविण्यात आल्या होत्या. याशिवाय उतर तक्रारींची लांब लचक यादी लाईनमन किंवा जनमित्र म्हणून ओळख्ाल्या जाणारया महावितरणच्या सैनिकाने सोडविल्या.
गडचिरेाली सारख्या दुर्गम जंगली भागात तर चंद्रपूरच्या कोरड्या कडक उन्हात महावितरणच्या अभियंता, कर्मचारी व लाईनमॅन यांनी तक्रारी सोडवून ग्राहकांना दिलासा दिला.
ग्राहकांशी सरळ संबंध येणाऱ्या लाईनमॅन यांनी विजपूरवठ्या संबंधित तक्रारी उन्हाने तापलेले विजखांब, डी. पी., रोहित्रे, वितरण पेट्या दुरुस्त करण्यात उन्हाशी सामना केला.
चंद्रपूर मंडलात वीजबिलसंबंधी 2हजार 810, विजपूरवठ्या संबधीत 5 हजार 800, विजेच्या मिटर संबंधित 999 तर विविध अर्जासंबंधित 118 तक्रारी सोडविण्यात आल्या.
तर गडचिरोली मंडलात वीजबिलसंबंधी 1हजार 644 विजपूरवठ्या संबधीत 1 हजार 794, विजेच्या मिटर संबंधित 441 तर विविध अर्जासंबंधित 1हजार 47 तक्रारी सोडविण्यात आल्या.
तर उन्हाळा व पावसाळा या मध्ये जो कालावधी असतो या कालावधीमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सोबत वादळवारे व पावसाच्या सरी घेऊन येतो. उन्हाळा पूर्ण संपलेला नसतो व पावसाळा पूर्णपणे आलेला नसतो. नवतपा काळजाची लाही लाही करत असतो. घामाने चिंब झालेली वर्दी ,पावसांने चिंब झालेली वर्दी लाईनमन किंवा जनमित्र म्हणून ओळख्ाल्या जाणारया मानसास सतत कर्तव्य पार पाडण्यास स्फुरर्ती देत असते.
महावितरणच्या वीज पुरवठ्यात महत्वाची भूमिका निभावणारे विजवाहिण्या व पिन व डिस्क इन्शुलेटर एकीकडे उन्हामुळे तापतात व पावसाच्या सरी पडल्या कि मग... तापलेले चिनी मातीचे पिन इन्शुलेटर फुटून त्यामध्ये पाणी शिरून विजपूरवठा खंडित होतो. डिस्क इन्शुलेटर मुख्यत्वे वीज पडल्यामुळे व तारा तुटल्यामुळे,फुटून जमिनीवर पडतात. अशावेळी खांब खांब फिरून पिन इन्शुलेटर शोधून काढून लाईनमॅन आपला अनुभव वापरून पिन इन्शुलेटर लोखंडी पाने पेचकस यांनी ठोकून टन टन आवाज येतोय की डब डब हे तपासून पाहतो. टन टन आवाज म्हणजे पिन इन्सुलेटर ठीक आहे व डब डब आवाज झाल्यास इन्शुलेटर बदलवन्याशिवाय पर्याय नसतो. निसरडया खांबावर चढूण पंक्चर झालेले पिन इन्शुलेटर शोधून काढून ते बदलण्यात येते व वीजपुरवठा सुरू करण्यास सिग्नल देण्यात येते. वीजपुरवठा झाल्यावर लाईनमन व ग्राहक यंाच्या चेहरयावर समाधानाचे हसू उमटते.
भर पावसात विजेच्या सावटात जंगली श्वापदाच्या, साप विंचूच्या व विषारी किटकांच्या भितीत महावितरणच्या धाडसी लाईन मॅननी चंद्रपूर व गडचिरोली मंडलात २२७ पिन इन्शुलेटर व ७५ डिस्क् इन्शुलेटर बदलले व विजपुरवठा सुरळीत केला. चंद्रपूर मंडलात ६० तर गडचिरोली मंडलात १६७ पिन इन्शुलेटर बदलले. सोबतच चंद्रपूर मंडलात ४० च्या वर च्या वर तर गडचिरोली मंडलात ३५च्या वर डिस्क् इन्शुलेटर बदलले. तसेच अनेक ठिकाणी डिस्क इन्शुलेटर बदलून तुटलेल्या विजतारा जोडून ग्राहकांचा विजपुरवठा सुरळीत केला.