चंद्रपूर - जिल्ह्यातील सावली, भद्रावती आणि रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या, सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर करीत असताना एक युवक दुचाकी विक्रीसाठी भिवापूर वार्डात येणार असल्याची माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप कापडे यांच्या पथकाने त्या युवकाला ताब्यात घेत दुचाकीच्या कागदपत्राबद्दल विचारले.
मात्र त्या युवकाने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, पोलिसांनी त्याला विश्वासात घेत विचारपूस केल्यावर त्या युवकाने सदर दुचाकी ही चोरीची असल्याचे सांगितले.
आरोपी 22 वर्षीय ऋशेष चंद्रभान आत्राम विसापूर निवासी असून त्याने याआधी सुद्धा दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी ऋशेष कडुन चोरीच्या 5 दुचाकी एकूण किंमत 1 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी आरोपिकडून एमएच 34 एआर 2748, एमएच 34 बीएक्स 0622, एमएच 34 बियु 9130, एमएच 34 झेड 0023 आणि एक विना क्रमांकाचे दुचाकी वाहन जप्त केले.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, संजय आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपाळ आतकुलवार व कुंदनसिंग बावरी यांनी यशस्वीपणे पार पाडली.
