प्रतिनिधी/अनिकेत अगडे
तळोधी(बा) : येथून जवळच असलेल्या कोजबी(चक) येथील 'सरस्वती विद्यालय' येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जनकल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था नवरगाव तर्फे धान्य किटचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या दुस-या लाटेत अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर बेरोजगारी व उपासमारीचे संकट निर्माण झाले होते. समाजऋण व विद्यार्थीऋण समोर ठेवून वर्ग ५ ते ९ च्या एकूण १०३ विद्यार्थ्यांना जवळपास ५० हजार रुपये किमतीचे तांदूळ, कणिक,साखर, तेल व मास्कचे वाटप संस्थेतर्फे करण्यात आले.
यापूर्वीही कोरोनाच्या पहिल्या व दुस-या लाटेत नागपूरस्थित अनेक गरजूंना जनकल्याण संस्थेतर्फे धान्य किटचे वाटप करण्यात आले हे विशेष. धान्य किटच्या वाटपाप्रसंगी संस्थासचिव मनिषाताई बारापात्रे, अध्यक्ष विजय बारापात्रे, सदस्य डाॅ. सुधाकर नवलाखे, रमेश मस्के, संकेत व उत्कर्ष बारापात्रे, मुख्याध्यापक दीपक बोकडे, शिक्षक चंद्रशेखर गायकवाड, मधुसूदन नागपूरे,घृष्णेश्वर बोरकर, लिपिक धनराज आत्राम, हरिहर मस्के, परिचर अशोक मेश्राम, गणेश मेश्राम, प्रदीप गोपाले उपस्थित होते.
याशिवाय एप्रिल महिन्यात वर्ग ५ ते १० च्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्राथमिक स्वास्थ्य उपकेंद्र कोजबी व जनकल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था नवरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी डाॅ. रजनी उमाटे, डाॅ. स्वप्नील कामडी, आरोग्यसेविका प्रतिभा भाकरे उपस्थित होत्या.
