चंद्रपूर - चंद्रपूर परिमंडळात ६३ हजार ४३३ ग्राहकांनी जानेवारी २०२१ ते मे २०२१ पर्यंत सुमारे ८ कोटी ८८ लाख ५४ हजार भरले.
एका क्लिकवर राज्यातील ग्राहकांना तत्पर व ऑनलाईन सेवा मिळावी यासाठी वीजग्राहक व कर्मचाऱ्यांकरिता महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या महावितरण मोबाईल ॲपला चांगला प्रतिसाद मिळत असून. आतापर्यंत महावितरणच्या तब्बल ५० लक्ष ग्राहकांनी ग्राहकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. हे ॲप ईंग्रजी व मराठीतुन वापरता येते. चंद्रपूर परिमंडळात ६३ हजार ४३३ ग्राहकांनी जानेवारी २०२१ ते मे २०२१ पर्यंत सुमारे ८ कोटी ८८ लाख ५४ हजार एका क्लिकवर जागच्या जागी लाईनीत न लागता किंवा घराबाहेर न पडता आपले वीज बिल भरण्यासाठी या ॲपचा वापर केला आहे. चंद्रपूर मंडलातील ४४ हजार ४६५ ग्राहकांनी या पाच महिण्यात ६ कोटी ६८ लाख् तर गडचिरोली मंडलातील १८ हजार ९६८ ग्राहकांनी २ कोटी २० लाख ४८ हजाराचेवीजबिल ॲपचा वापर करीत भरले आहे. कोरोनाकाळात ५ हजार ५१५ ग्राहकांनी ॲपचा वापर करुन रिंडींग पाठविले.
या ॲपद्वारे नवीन ग्राहकांना वीजजोडणी अर्ज, नवीन ग्राहक क्रमांक जोडण्याची किंवा काढण्याची सुविधा, गो-ग्रीन म्हणजे ई मेलवर वीजबिल प्राप्त् करण्याची सुविधा मिळविणे, ग्राहकसेवा केंद्र व जवळचे कार्यालयाची तसेच वीजबिलभरणा केंद्राची माहिती, नवीन जोडणी साठी अर्ज करणे व सध्याची अर्जाची स्थिती जाणूनघेणे. नाव बदल्ण्याची मागणी, वीजजोडभार बदलण्याची मागणी, पुर्णजोडणी शुल्क भरण्याची सुविधा, उपयुक्त संकेतस्थळाचे दुवे, वीजदेयक भरणा करण्याची सुविधा, वीजदेयक व वीजदेयक भरणा केल्यासंबंधी तत्सम पुर्व माहिती, याशिवाय ज्या ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यात आले नाही. त्यांना ॲपद्वारे मीटर रिडींग पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे,कृषि वीज योजना २०२० नुसार कृषिपंपाची थकबाकी पाहण्याची सुविधा, वीजबिलासंबंधी तसेच वीजपुरवठा ख्ंडीत झाल्या संबंधीतक्रारी नोंदविण्याची सुविधा, वीजग्राहकांना ज्या वीजवाहिणीवरुन वीजपुरवठा होतो. त्या वीजवाहिणीची माहिती, नादुरुस्त् रोहित्रा संबधी महिती नोंदविणे, वीजचोरीची माहिती कळविणे, संपर्काची व मोबाईल क्रमांकांची माहिती अदयावत करणे तसेच अभिप्राय कळवणे. इत्यादीसेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. हे ॲप महावितरण वेबसाईट, गुगलप्ले, ॲपल, विंडोज प्ले स्टोअर्स येथे उपलब्ध आहे. या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी केले आहे. विभागनिहाय ॲपचा वापर करुन भरण्यात आलेली रक्कम विभाग जानेवारी २१ फेब्रुवारी २१ मार्च २१ एप्रिल २१ मे २१ ग्राहक संख्या भरलेली रक्कम ल बल्लारशाह १६०३ २२ लाख १५५२ २६.७४ लाख १६२६ २५.२५ लाख १४६२ २०.२५ लाख १९६४ ३२.१८ लाख च्ंद्रपुर ४११८ ५८.६३ लाख ३९७८ ७१.३३ लाख ४७३६ ७१.५१ लाख ४६४१ ७०.४३ लाख ५२६५ १०५.७५ लाख वरोरा २४०७ २८ लाख २६५८ ३०.८२ लाख ३२६८ ३३.२ लाख २२५७ २७.८७ लाख २९३० ४४.१३ लाख आलापाल्ली ९७३ ९.२५ लाख ९१० १०.६८ लाख १४३६ ११.८३ लाख ११८२ ८.५७ लाख १३३६ १४.१३ लाख ब्रम्हपुरी ९२४ ११ लाख ११८७ १५.४५ लाख १४२१ १९.६९ लाख ११४१ १२.१२ लाख १३४२ १९.११ लाख गडचिरोली ११४७ १३.१२ लाख १३४६ १७.४ लाख १५२८ १८.५५ लाख १६२८ १७.५३ लाख १४६७ २१.९६ लाख.
