अनिकेत अगडे/प्रतिनिधी नागभीड
तळोधी ( बा) - कोरोनामुळे नाभिक समाजावर कोसळलेले संकट लक्षात घेऊन आमदार बंटी भांगडिया यांनी नाभिक बांधवांना अन्न धान्याची कीट भेट देऊन मदतीचा हात दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यातील सर्व सलून दुकाने बंद ठेवण्याच्या सलून व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली होती. एवढेच नाही तर अनेक सलून दुकानांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या कुटूंबावरही उपासमारीची पाळी आली आहे.या लोकांना दिलासा मिळावा यासाठी तळोधी(बा) अप्पर तहसील अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील सलून दुकान चालकांना व सलून दुकानात काम करणाऱ्या व्यक्तींना आमदार बंटी भांगडीया यांचेकडून किराणा किटचे वाटप करण्यात आले यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके, सभापती अवेश पठाण , उपसभापती रमेश बोरकर,न.प. उपाध्यक्ष गणेश तर्वेकर,सचिन आकुलवार, उपसरपंच राजेश घिये, राजु बिरेवार,प्रकाश कुंभरे,आनंद भरडकर,जिवेश सयाम,नरेंद्र खोब्रागडे महेश नंदनवार सुभाष मस्के उपस्थित होते.
