कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील बोरीनवेगाव येथे कृषी संजीवनी मोहीमेंतर्गत पिक स्पर्धा रब्बी हंगाम २०२०,२१ अंतर्गत विभागीय स्तर प्रथम क्रं.रामचंद्र हिरामण कुळमेथे,कृषी सहायक बी. एल.तिडके व भाजीपाला उत्पादक हबीब शेख यांचा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी रविंद्र ढमाळे,कृषी सहायक कोकणे मॅडम, बी.जी.बेवनाळे, डी.बी.भगत,डीयू कुळमेथे,हबीब शेख,साईनाथ कुंभारे, पत्रकार शंकर तडस,अंबुजा फाउंडेशनच्या कामटकर,कृषीमित्र योगेश केराम आदींची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांनी शेतीचे तंत्र समजून उत्पन्न घेतले तर ती शेती फायद्याची ठरेल. त्यासाठी संपूर्ण जीव लावून शेती करावी लागेल.असे मोलाचे मार्गदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे यांनी उपस्थीतांना केले.साईनाथ कुंभरे यांनी शेतीतील नवीन प्रयोगाचे अनुभव सांगितले तर हबीब शेख यांनी भाजीपाला लागवड तंत्रज्ञाना विषयीची सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रमात बोरीनवेगाव येथील शेतकरी उपस्थीत होते.
