कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यात सर्वात मोठ्या गडचांदूर शहरातील अनेक गोरगरीब कुटुंबांना शासनातर्फे घरकुल मंजूर झाले.स्थानिक नगरपरिषद अंतर्गत दोन डीपीआर मंजूर झालेले आहे.त्यापैकी पहिल्या डीपीआर मध्ये ७७ लाभार्थी मंजूर असून त्यांना फक्त राज्य शासनाचा एक लाख रुपये निधी मिळाला.
परंतू केंद्र शासनाकडून मिळणारा दीड लाखाचा निधी अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही.हा निधी आपण पाठपुरावा करून घरकुल धारकांना मिळवून देवु,तसेच हे ७७ झाल्यानंतर पुन्हा ज्यांना हक्काचे घर नाही त्या कुटुंबांना घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी माहिती गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष शरद जोगी यांनी News34 शी बोलताना दिली आहे.