गडचांदूर/सैय्यद मुमताज अली
प्रभारी पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मुखबिर द्वारे जनावरांना कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता त्यांनी गडचांदूर पोलीस निरीक्षक गोपाळ भारती यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले.
पोलीस निरीक्षक भारती यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह सापळा रचला व 2 ट्रक क्रमांक एमएच40 बीएल1079 व टी एस 07 युबी 0472 ला थांबवित चौकशी केली असता सदर वाहनात अत्यंत क्रूर व निर्दयीपणे 48 जनावरे त्या वाहनात कोंबून ठेवले होते.
पोलिसांनी वाहन चालक 24 वर्षीय सिराज बकसुदिन पठाण रा. तेलंगणा, 26 वर्षीय शेख सारीक शेख मूर्रा रा.गडचांदूर, 22 वर्षीय फारुख खान गफ्फार खान रा. गडचांदूर यांना ताब्यात घेतले.
आरोपीकडून जप्त करण्यात आलेली जनावरे गोंडपीपरी येथील श्रीकृष्ण गोशाळा व सेवा संस्थेत दाखल करण्यात आली.
सदर प्रकरणातील फरार आरोपी संजय वालदे रा. वर्धा व जनावर मालक इम्रान शेख रा. गडचांदूर यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारित 2015 व प्राण्यास निर्दयीपणे वागविणे प्रतिबंध अधिनियम 1960, कलम 5, 5 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर प्रकरणी 48 जनावरे किंमत 5 लाख 12 हजार व दोन ट्रक किंमत 20 लाख असा एकूण 25 लक्ष 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ भारती, धर्मराज मुंढे, सुभाष तिवारी, प्रभू मामीडवार, व्यंकटेश भटलाडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

