चंद्रपूर/ताडोबा - ताडोबा कोर क्षेत्रात 11 जूनला मुधोली मध्ये 65 वर्षीय भारत रामा बावणे हे बांबू तोडण्याकरिता जंगलात गेले होते, सायंकाळी झाल्याने ते परत घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ते कुठे आढळून आले नसल्याने रात्री वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयात त्याबाबत माहिती देण्यात आली.
वनविभागाच्या चमूने बावणे यांचा शोध घेतला असता रात्री त्यांचा शोध लागला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मोहर्ली येथील वन्यक्षेत्रात आंबेगड नियतक्षेत्र क्रमांक 138 मध्ये बावणे यांचा मृतदेह आढळून आला.
वाघाच्या हल्ल्यात बावणे यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने लावला.
वनविभागाच्या वतीने जनाबाई बावणे यांना तातडीने 50 हजारांची मदत दिली.
