चंद्रपूर - सरकार नगर वार्ड चंद्रपूर येथे सरकार नगर वासीयांचे श्रध्दास्थान असलेले एकमेव जागृत हनुमान मंदिर आहे व त्या सभोवताल मोठा परिसर आहे. सदरच्या परिसरात व मंदिरात पूर्वकाळापासून नगरवासी नियमित मंदिरात पुजाअर्चा करीत असतात व छोटे-मोठे मुलं मैदानी खेळ खेळत असतात. सध्या मंदिराच्या परिसरात अमृत योजना अंतर्गत पाण्याची टाकी तयार करण्यात आलेली आहे. टाकीचे काम पूर्ण झालेले असूनही परिसर आजतागायत स्वच्छ केलेला नाही. मंदिर परिसरात सर्वत्र बांधकाम साहित्य पडलेले आहे तसेच मोठे मोठे पाण्याचे डबके तयार झालेले असून त्यामध्ये घाण पाणी साचून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
त्यामुळे जवळच्या परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. एकूणच परिसरातील लोकांना आणि युवकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
सदर मंदिरात मोठे धार्मीक सण साजरे करण्याची परंपरा आहे. तसेच वार्डातील मुलांना मैदानी खेळण्याकरीता एकमेव मैदान आहे. दरम्यानच्या काळात कोराना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता मंदिरात व मंदिर परिसरात जाणे-येणेस प्रतिबंध होते त्यामुळे सदर परिसर दुर्लक्षीत होता परंतु आता चंद्रपूर जिल्हा अनलॉक झालेला असल्यामुळे मंदिरत व मंदिर परिसरात जाण्यास परवानगी आहे. परंतु मंदिर परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्यामुळे तिथे जाता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. आधिच कोरोनामुळे बाहेर पडता येत नसल्यामुळे घरात राहुन ज्येष्ठ नागरीक, लहान मोठे मुल-मुले त्रासुन आहे.
वर दिल्या प्रमाणे वस्तुस्थिती लक्षात घेता आम्ही आयुक्तांना विनंती केली की सरकार नगर पाण्याची टाकी परिसरातील तात्पूरती स्वच्छता करण्यात यावी जेणेकरून ज्येष्ठ नागरीकांना मंदिराचा व मुलांना खेळयाकरीता मैदानाचा लाभ घेता येईल.यावेळी एनएसयूआय प्रदेश महासचिव कुणाल चहारे , केतन दुर्सेलवार, वैभव येरगुडे,अभिजित मत्ते, साहिल आसुटकर , अनिकेत मुखर्जी, ओम आसकर, अंकित आसुटकर, चेतन बारेकर, चैतन्य आसकर, कुणाल खिरटकर, आदेश आसुटकर, रोहित मुखर्जी, अभय ठाकूर, अथर्व भोयर ,प्रीतम पंचबुधे, हितेश डांगरे आदी उपस्थित होते.

