चिमूर - सात आठ दिवसाच्या पूर्वी सायंकाळच्या दरम्यान कोल्ही परिसरात अन्नाच्या शोधात निघाली होती कोल्ही ला पाहुन परिसरातील कुत्रे मागे धावले अंधारात काही न सुचता आपला जिव वाचविन्याच्या उद्देशाने वेगाने धावत असताना कोल्ही वडाळा पैकु येथील मुकबधीर विद्यालयाच्या जवळील ओपन पेस मधील कोरड्या विहीरीत पडली मुकबधीर शाळेचे मुख्याध्यापक रामदास कामडी आपल्या घराला पाणी मारन्यासाठी आले असता त्यांना कोल्ही विहीरीत जोर जोराने ओरडत असल्याचे कानी पडले लगेच विहीरीकडे धाव घेत विहीरीत डोकावून बघीतले असता त्यांना विहीरीत कोल्ही दिसली त्यांनी शहरातील एका पर्यावरणवादी ला ही माहीती सांगीतली पर्यावरणवादी व वनविभागाचे कर्मचारी येवून गेले. अखेर अन्न पान्याविना कोरड्या विहीरीतच कोल्ही चा तडफडून दुर्दैवी मृत्यु झाला हि घटना बुधवार ला रात्री आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
शहरातील महाकाली नगर व वडाळा ( पैकु ) मोक्षधाम परिसराला लागुन शेतशिवाराची जमीन आहे यापैकी काही जमीनीवर लेआउट पडले आहे अनेकांनी घरे बांधली आहे मात्र आजही या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असताना अनेकांनी बघीतले आहे कोल्ही चे घर ले आउट मधील पाणी वाहुन जान्याच्या भोंग्या मध्ये आहे.
सायंकाळच्या दरम्यान कोल्ही अन्नाच्या शोधात निघत असल्याची चर्चा आहे सात आठ दिवसा पूर्वी अशीच एक कोल्ही सायंकाळच्या दरम्यान अन्नाच्या शोधात निघाली होती कोल्ही ला पाहुन परिसरातील कुत्रे धावले जिव वाचविन्याच्या बेताने सुसाट वेगाने धावता धावता मुकबधीर विद्यालया चवळील ओपन पेस मधील पस्तीस फुट खोल असलेल्या कोरड्या विहीरीत पडली कोरड्या विहीरी ला लागुनच मुक बधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास कामडी यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे घरा ला पाणी मारत असताना तिन दिवसा पूर्वी विहीरीत कोल्हीच्या ओरडन्याचा आवाज आला लगेच ते विहीरीकडे गेले त्यांना विहीरीत कोल्ही असल्याचे दिसले ही माहीती शहरातील पर्यावरणवादी संवर्धनवादी म्हणून मिरवनार्या एका व्यक्ती ला दिली पर्यावरणवादी व वनविभागाचे कर्मचारी विहीरीत पडलेल्या कोल्हीला पाहुन गेले.
माहीती मिळाल्या पासुन तिन दिवस कोल्ही विहीरीतच होती तिला विहीरीतुन काढन्याचे सौजन्य सुद्धा या पर्यावरण संवर्धनवादी ने दाखवीले नाही मात्र वादळ पावसाने नेरी येथे किती चिमन्या मेल्या हे चित्र पहायला गेले असल्याचे समजते.
बुधवार रात्रो ला RO नरड यांनी घटना स्थळाला भेट दिली बॅटरीच्या प्रकाशाने विहीरीत पाहीले असता कोल्ही मृत झाल्याचे आढळले तिन दिवसा पूर्वी कोरड्या विहीरीत कोल्ही पडल्याची चर्चा शाळे जवळील परिसरात झाली विहीरी ला पाणी नाही अनेकांनी भाकर तुकडा टाकला ति खात होती मात्र तिला पाणी मिळत नव्हते नागरीकांनी विहीरीतुन काढन्याचा प्रयत्न सोडा तिला पाणी सुद्धा पाजले नाही पाणी पाजले असते तर ती जिवंत असती शहरातील एक मी पर्यावरणवादी म्हणून मिरवनारा व वन विभागाच्या दुर्लक्षामुळे त्या कोल्हीचा अन्न पान्याविणा दुरदैवी मृत्यु झाला त्या कोल्ही चा अंतीमसंस्कार चिमूर वन विभाग कार्यालय परिसरात गुरुवार ला अधिकारी वनकर्मचारी यांच्या उपस्थीतीत करन्यात आला तिच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
