प्रतिनिधी/अनिकेत अगडे
तळोधी बाः चंन्दपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्याचा शासननिर्णय झालेला असताना उत्पादन शुल्क विभागाने नवीन परवानाधारक तसेच जुने परवानाधारक धारकांचे नुतणीकरण करताना गावाच्या बाहेर दुकाने थाटण्याची परवानगी दयावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .
१७ सदस्य संख्या असलेल्या नागभीड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे .धानाची मुख्य बाजारपेठ असल्याने या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठ करिता येत असतात .तसेच साईनगरी असलेल्या तळोधी बा. येथे भावीक भक्त दर्शन साठी नेहमी येत असतात .त्या मुळे रहदारी ठिकाण असल्याने दारु दुकाणाचा मनस्ताप आजूबाजूच्या दुकानदारांना तसेच नागरिकांना होणार आहे .तसेच या मार्गाने निमुळते रस्ते असल्यामुळे या अगोदर गावात असणारे दारु दुकाने मुळे नागरिकांना नाहक त्रास होत होता.अनेकदा गुरुदेव भक्त ,स्त्री पुरुष नी गावाच्या बाहेर दारु दुकाने हटविण्यासाठी आंदोलन केलेले होते .तसेच दारु दुकानदार यांना पार्कीगसाठी व्यवस्था नसल्याने अनेक दारु पिणारे नागरिक रस्त्यावर वाहणे उभी करुन दारु पित असतात .त्यामुळे याठिकाणी नेहमी वर्दळ असते .मात्र याच मुख्य मार्गाने नागरिक ,शालेय विद्यार्थी ,महिला पुरुष यांना जावे लागते असल्यामुळे दारुची दुकाने गावाबाहेर थाटण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .
अप्पर तालुक्यातील तळोधी बा.हे शहर मोठे असून याठिकाणी बाजारपेठ करीता मोठ्या प्रमाणात नागरिकांची रेलचेल सुरू असते .गावात दारुचे दुकाने असल्याने महिला वर्गाला ,शालेय मुला-मुलीना ठिकाणाहून जाता-येताना मोठा त्रास होत असल्याने शासनाने नुतणीकरण करताना गावाच्या बाहेर दुकाने थाटण्यांची परवानगी दयावी.
विलास लांजेवार
ग्रामपंचायत सदस्य तळोधी बा.
