चंद्रपूर - महाराष्ट्र मंत्री मंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला,
या निर्णयाने मद्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले मात्र काहींनी या निर्णयाचा विरोध केला.
4 जून ला गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी कायम ठेवण्याची मागणी केली.
मोर्च्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली, हा निर्णय महिलांचा अपमान करणारा आहे हा निर्णय सरकारने तात्काळ मागे घेत चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी कायम करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
पालकमंत्री यांनी नागरिकांच्या हिताचे कार्य करायला हवे, असे निर्णय घेत त्यांनी येणारी पिढी धोक्यात टाकली आहे अशी प्रतिक्रिया गुरुदेव सेवा मंडळाच्या महिला पदाधिकारी यांनी दिली आहे.