घुग्गुस - देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असून आता अश्या घटनेत विकृत मानसिकता असलेल्या नागरिकांचा समावेश झाला असून त्यांच्या नजरेत लहान मुले व वृद्ध नागरिकांवर वक्रदृष्टी आहे.
अशीच एक संतापजनक घटना घुग्गुस शहरात घडली, शुक्रवारी 4 जूनला पहाटेच्या सुमारास 60 वर्षीय वृद्धा शौचास गेली असता एका विकृत मानसिकता असलेल्या 22 वर्षीय युवकाने त्या वृद्धेवर अत्याचार केला.
या घटनेनंतर काही वेळासाठी परिसरात तणावाचे वातावरण होते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे हे तात्काळ घुग्गुस येथे दाखल झाले व शहरातील परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले.
आरोपी 22 वर्षीय यासिन नूर इस्लाम शेख हा 15 दिवसांपूर्वी झारखंड वरून घुग्गुस येथे राहायला आला होता, त्याच्या या कृत्याने शहरात संतापाचे वातावरण आहे.
घुग्गुस पोलिसांनी आरोपीवर 354 (A), 376 (1) व 506 अंतर्गत गुन्हे दाखल केले, पुढील तपास सपोनि मेघा गोखरे करीत आहे..
पिपासू वृत्ती चे लोक आहेत हे, अशा नराधमांना कायदाही लवकर शिक्षा देत नाही.
उत्तर द्याहटवा