चंद्रपूर - चंद्रपुर शहर हदद्दीत घुटकाला वार्ड येथे अनैतीक संभोग करणान्या आरोपीस १६/०६/२०२१ रोजी मा . श्री . केदार , जिल्हा न्यायाधीश चंद्रपुर यांनी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे . पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर अंतर्गत दिनांक ०३ / ०५ / २०१ ९ रोजी घुटकाला वाई येथे फिर्यादी हा आपल्या आई - वडील भावासह आरोपी नामे फिरोज खान हबीब खान पठाण वय ३५ रा . नविन वस्ती घुटकाला वार्ड चंद्रपुर यांचे वडीलांचे घरी किरायाने राहत होते . आरोपीची पत्नी ही माहेरी गेला असताना आरोपीने फिर्यादीला आपल्या स्वत : च्या घरी झोपण्यास घेवुन गेला व जबरदस्तीने अनैतीक संभोग केला अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे अप क . ३६ ९ / २०१ ९ कलम ३७७,४५२ , भादंवि सहकलम ४ पोक्सो अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा तपासात घेतल्यानंतर मपोउपनि . प्राजक्ता नागापुरे यांनी आरोपीस निष्पन्न करून आरोपीविरूध्द सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक १६/०६/२०२१ रोजी आरोपी नामे फिरोज खान हबीब खान पठाण वय ३५ रा . नविन वस्ती घुटकाला वार्ड चंद्रपुर यास कलम ३७७ भादंवि व ४ पोक्सो मध्ये ०७ वर्ष कारावासाची शिक्षा व ५,००० / - रू दंड न भरल्यास ०१ वर्ष शिक्षा मा . श्री . केदार , जिल्हा न्यायाधीश चंद्रपुर यांनी ठोठावली आहे . सदर प्रकरणामध्ये सरकार तर्फे अॅड . श्री . संदीप नागापुर , सरकारी अभियोक्ता , चंद्रपूर आणि कोर्ट पैरवी म्हणुन पोहवा . संतोष पवार , पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांनी काम पाहिले.