कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
भारताची एकता आणि अखंडतेसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे भारतीय जनसंघाचे संस्थापक "डॉ.शामाप्रसाद मुखर्जी" यांच्या स्मृतिदिनानिमित्त गडचांदूर येथील भाजप कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.भाजपचे जेष्ट नेते शिवाजी सेलोकर यांच्या हस्ते डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहण्यात आली.याचबरोबर येथील नगरसेवक अरविंद डोहे यांच्या निवासस्थानासह इतर प्रभागातही कार्यक्रमाद्वारे डॉ.मुखर्जी यांना श्रद्धांजली देण्यात आली.भाजप कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात शिवाजी सेलोकर, शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,माजी नगरसेवक निलेश ताजने,नगरसेवक रामसेवक मोरे, नगरसेवक अरविंद डोहे,माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे,सौ.कल्पना जोगी,सौ.शारदा क्षीरसागर,हरीश घोरे,अरविंद कोरे,अजी़म बेग, ईम्रान पाशा,मयूर खान,कुणाल पारखी,गणपत बुरडकर,हरीभाऊ मोरे,परशुराम मुसळे, सुयोग कोंगरे,सुरेशकुमार आदींची प्रामुख्याने उपस्थीती होती.
