घुग्गुस - देशात कोरोनाच्या उद्रेकानंतर शासकीय सेवेत असणाऱ्या सर्वाना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली मात्र अत्यावश्यक सेवा व फ्रंटलाईन वर्कर मधून वेकोली कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले यामुळे वेकोली कर्मचाऱ्यात रोष निर्माण झाला आहे.
वेकोली कर्मचारी व कुटुंबियांचे लसीकरण व्हावे यासाठी शुक्रवार 14 मे ला आयटक कार्यालयात आयटक, एचएमएस, बीएमएस व सिटू या वेकोली संघटनांनी सर्वानुमते बैठक घेत वणी व जिल्ह्यातील वेकोली कर्मचारी व कुटुंबीयांच लवकरात लवकर लसीकरण व्हायला हवं यासाठी जिल्हाधिकारी चंद्रपूर व यवतमाळ जिल्हा यांना निवेदन देण्यात आले.
लसीकरण न झाल्यास 27, 28 व 29 मे आणि 17, 18 व 19 जून 2021 ला सर्व वेकोली संघटनेतील सदस्य व वेकोली कर्मचारी सामूहिक रजा घेणार असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.
त्यानंतर ही प्रशासन जागे झाले नाही तर दर 15 दिवसानी सामूहिक रजा घेण्यात येणार असा इशारा एचएमएस चे अध्यक्ष दीपक जायस्वाल, कार्यकारी अध्यक्ष संजय तिवारी, विकास सोनटक्के, AITUC अध्यक्ष जियाउल्हा खान, मुरली चिंतावार, बीएमएस अध्यक्ष हरिदास दुधबळे, राजू नामपल्लीवार, CITU अध्यक्ष संतोष डे व प्रमोद अर्जुनकर यांनी दिला.
